ईलाइफ एस ५.५ स्मार्टफोन मार्चअखेरी भारतात

जगातील सर्वाधिक स्लीम स्मार्टफोन म्हणून नाव मिळविलेला चिनी कंपनी जिओनीचा ईलाईफ एस ५.५ हा स्मार्टफोन ३० मार्चला गोव्यात लाँच केला जात असल्याचे समजते. हा अॅड्राईड स्मार्टफोन आंतरराष्ट्रीय बाजारात यापूर्वीच उपलब्ध झाला असून त्याची किंमत आहे ३७० डॉलर्स. भारतात हा फोन २३ हजार रूपयांत उपलब्ध होणार आहे.

केवळ ५.५ मिलिमीटर जाडीच्या या स्मार्टफोनला ५ इंची डिस्प्ले असून १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.