वर्ल्डफ्लोट देतेय फेसबुकशी टक्कर

वर्ल्डफ्लोट या देशी सोशल मिडिया साईटने जगप्रसिद्ध फेसबुकसमोर भारतात आव्हान उभे केले आहे. या साईटचे देशात सध्या ५ कोटी युजर आहेत तर फेसबुकचे १० कोटी युजर आहेत. विशेष म्हणजे वर्ल्डफ्लोट ही साईट जून २०१२ मध्ये पुष्कर माहता या युवकाने सुरू केली आहे. केवळ दोन वर्षात या साईटने ५ कोटी युजरचा टप्पा गाठला आहे.

या विषयी बोलताना पुष्कर म्हणाले की युवकांसाठी अतिशय उपयुक्त असे व्हिडीओ ट्यूटोरियल हे नवे फिचर सुरू केल्यापासून आमची युजर संख्या एकदम वाढली आहे. या फिचरमुळे विद्यार्थी, स्पर्धा परिक्षा देणार्‍याना व्हिडीओच्या माध्यमातून ट्यूटोरियल्स दिली जातात. त्याचबरोबर या साईटवर १० हजार ऑनलाईन चित्रपट मोफत दाखविले जातात. त्यात बॉलीवूड, हॉलीवूड. प्रादेशिक भाषांतील चित्रपटांचा समावेश असतो. तसेच या साईटच्या माध्यमातून जगभरातील वर्तमानपत्रे, न्यूजचॅनलशीही कनेक्ट होता येते.

Leave a Comment