ठाणे: ठाण्यातल्या समतानगरमध्ये सुंदरबन पार्क या इमारतीला भीषण आग लागलीय. इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागलीय. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून इमारतीत काहीजण अडकले आहेत. अडकलेल्यांना काढण्याचे काम युध्दपातळीवर काम सुरू आहे.

घटनास्थळी आरडीएमसी टीम आणि अग्निशमन दलाच्या चार गाडल्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडे पुरेशी यंत्रणा नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहे. दरम्यान, या आगीत दोघांचा मृत्यू झालाय. शिवाजीराव चौघुले (८४ वर्ष), निर्मला चौघुले (७८ वर्ष) या दोन वृद्धांचा मृत्यू झालाय. तर विक्रमादित्य राजीव सावे आणि रंजना सावे हे दाम्पत्य गंभीर जखमी आहे.
ही आग रविवारी पहाटे पाच वाजण्यायच्या सुमारास लागली. मात्र आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. यावेळी अग्निशमन दलाच्यावतीने मदत कार्य जोमाने सुरू होते. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.