सानिया मिर्झा – कॅरा उपांत्य फेरीत

नवी दिल्ली – भारताची टेनीस स्टार सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची साथीदार कॅरा ब्लॅक जोडीने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. या स्पर्धेत भारताचा अनुभवी खेळाडू लिएण्डर पेस आणि त्याचा साथीदार राडेक स्टेपानेकला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. तर दुसरीकडे भारताच्या रोहन बोपण्णाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत जगातील पाचव्या मानांकित सानिया-कॅरा जोडीने द्वितीय मानांकित इकेटेरिना माकारोव्हा आणि एलेना व्हेस्निना जोडीवर ६-४, ६-१ असा सरळ सेटमध्येत पराभव करीत विजय मिळवला. आगामी काळात होत असलेल्याच उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर ल्युसी राडेका आणि जि झेंग जोडीचे आव्हान असणार आहे. दरम्यान बिगरमानांकित रॉजर फेडरर आणि स्टॅनिसलॉस वॉवरिन्का जोडीने चौथ्या मानांकित पेस-स्टेपानेक जोडीवर ६-३, ६-७, १०-४ असा विजय मिळवत विजयी घौडदोड सुरूच ठवली आहे.

दरम्यान या स्पघर्धेत पेस-स्टेपानेक जोडीला तीनपैकी केवळ एकाच ब्रेकपॉइंटचा उपयोग करून घेता आला. उपांत्य फेरीत फेडरर-स्टॅनिसलॉस जोडीसमोर अलेक्झांडर पेया आणि ब्रुनो सोरेसचे आव्हान असणार आहे. पेस पराभूत झाल्याने स्पर्धेतील भारतीय पुरुष टेनिसपटूंचे आव्हान संपुष्टात आले आहे. तर दुसरीकडे भारताचा आणखी एक टेनीसपटू रोहन बोपण्णा हा पाकिस्तानच्या ऐसाम उल हक कुरेशीच्या साथीने खेळताना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीयाचे लक्ष सानिया मिर्झाच्‍या खेळीकडे लागले आहे.

Leave a Comment