मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा सुरू असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतील महिला आघाडीमध्येही असंतोष खदखदू लागला आहे. या असंतोषाचा केंद्रबिंदू हा विधान परिषदेवर पाठवण्यात येणा-या शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गो-हे या आहेत. त्यांच्या मुळे महिला पदाधिक-यांत गेल्या काही दिवसांपासून वाद रंगला आहे.
गेल्या वेळेस विधान परिषदेवर जाण्यासाठी सर्व तयारी केल्यानंतर ऐनवेळी विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पत्ता कापण्यात आलेल्या शिवसेना उपनेत्या मीना कांबळी यांना पुन्हा एकदा निराश करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक वर्षे शिवसेनेत कार्यरत असलेल्या शिवसेनेच्या उपनेत्यांना आमदारकी न देता पुन्हा एकदा निलम गो-हे यांनाच उमेदवारी देण्यात आल्यामुळे महिला आघाडीत बिघाडीचे वातावरण आहे. त्या-मुळे गेल्याे काही दिवसांपासून होत असलेल्याे कार्यक्रमांकडे या महिलांनी पाठ फिरवली आहे.
गेल्या वेळेस विधान परिषदेवर दोन सदस्य पाठवण्यात येणार होते. त्यामध्ये दक्षिण मुंबईतील विभाग अध्यक्ष आणि पक्षाच्या उपनेत्या मीना कांबळी यांची वर्णी लागणार होती. त्यासाठी त्यांना ‘मातोश्री’वरून तयारीही करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु ऐनवेळी विनायक राऊत यांना संधी देऊन मीना कांबळी यांचा पत्ता कापण्यात आला होता. त्यामुळे पुढील वेळेस विधान परिषदेवर पाठवण्यात येईल, असे आश्वासन शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडून देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष निलम गो-हे आणि राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेतील महिला आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे. विशेषता सेनेतील महिला प्रत्येुकवेळी नीलम गो-हे यांना संधी दिली जात असल्याफने नाराज आहेत. त्यामुळे आगामी काळात निवडणूका असल्याने ही महिलांची असलेली नाराजी त्यांना दूर करावी लागणार आहे.