
दिल्ली – आजपर्यत चीन कर्मचारी आणि मजुरांना सर्वाधिक कमी मजुरी मिळणारा देश म्हणून ओळखला जात होता. चीनमधील स्वस्त लेबरमुळेच चीनी वस्तू स्वस्तात विकायला परवडतात असेही सांगितले जात होते. टॉवर वॉटसन या जागतिक पातळीवर सेवा देणार्या कंपनीच्या अहवालानुसार मात्र चीनपेक्षाही भारतातील मजुरांनाच नव्हे तर अधिकारी श्रेणीतील लोकांनाही कमी वेतन दिले जात आहे. चीममध्ये दिले जात असलेले वेतन हे भारतीयांच्या तुलेनेत जवळजवळ दुप्पट असल्याचे हा अहवाल सांगतो.
