पुढील आर्थिक वर्षात महिला बँकेच्या ५५ शाखा

पणजी- देशातील पहिली भारतीय महिला बँक पुढच्या आर्थिक वर्षात देशभरात ५५ नवीन शाखा सुरू करणार आहे. पणजी येथील महिला बँक शाखेचे उद्घाटन करताना बँकेच्या अध्यक्षा उषा अनंतसुब्रह्मण्यम यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की या वर्षअखेरपर्यंत आमच्या बँकेच्या २५ शाखा सुरू होत असून पणजीतील शाखा ही १४ वी आहे.

पुढच्या आर्थिक वर्षात दुसर्‍या श्रेणीतील तसेच बॅकींग सेवा नसलेल्या देशाभरातील ५५ ठिकाणी शाखा सुरू केल्या जात आहे. बँकेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन मुंबईत पंतप्रधान मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांच्या हस्ते नोव्हेंबर ००१३ मध्ये झाले होते. या बँकेत कुणींही पैसे जमा करू शकतात मात्र कर्ज देताना प्राधान्याने महिलांना दिले जाते. महिला काटकसरी असतात आणि त्यांच्याकडून कर्जवसुली करणे सहज आणि सुरक्षित असते. कर्जफेडीत महिला नेहमीच अग्रेसर असतात असेही त्या म्हणाल्या.
बँकेने वाहन कर्जासाठी टाटा मोटर्सबरोबर सहकार्य करार केला आहे तसेच मुलींच्या सीएच्या शिक्षणासाठी भारतीय सनदी लेखाकार संस्थेशी करार केला असल्याचेही समजते.

Leave a Comment