यंदा पवार म्हणत असतील: हेची का फळ मम तपाला!

पुणे (विशेष प्रतिनिधी) – यंदा निवडणुकांची तयारी सर्वात अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली होती. त्यावेळी काही ज्येष्ठ मंत्र्यांना दिल्लीत नेण्याचे सूतोवाच शरद पवार यांनी केले होते. पण त्यांच्या गळाला फक्त दोनच मंत्री लागले, एका इच्छुक उमेदवाराने तिकीट घेणार नाही असे स्पष्ट सांगितले तर दुस – या ज्येष्ठ मंत्र्यांनी लोकसभेची निवडणूक लढवायला नकार दिल्याने एक जागा सोडून देण्याची नामुष्की पवारांवर आली. त्यामुळे या निवडणुकीत पवार स्वत: जरी उमेदवार नसले तरी त्यांना काही ठिकाणी नकार घंटा ऐकण्याची वेळ आल्याने त्यांची अवस्था हेची का फळ मम तपाला असेच विचारण्यासारखी झाली आहे.

गेली चार दशकांहून अधिक वर्षे शरद पवार राज्याच्या व देशाच्या राजकारणात आहेत. महाराष्ट्राता त्यांचा शब्द अंतिम मानला जात असे. त्यांचे सांगणे धुडाकावून लावणे तर दूरच पण स्पष्टपणे तोंडावर नाकारण्याचेही धाडस कोणी करत नव्हते. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र चित्र बदलले असून पवारांना त्यांच्याच स्वपक्षीयांकडून स्पष्ट तोंडावर नकार झेलण्याची वेळ प्रथमच आली आहे. सुरूवातीला जागा वाटपाचा तिढा काँग्रेसबरोबर होता पण त्यातून मागच्या इतक्याच म्हणजे 22 जागा पदरात पाडून घेण्यात पवारांनी यश मिळवले.
ज्येष्ठ मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्यात पवारांना फारसे यश मिळाले नाही. कारण राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच अजित पवारही गेली वीसवर्षे मंत्री असल्याने ते ज्य़ेष्ठ मंत्रीच आहेत, त्यामुळे दादा तुमच्या लोकसभेचा मतदार संघ कोणता असा सवाल जाहीरपणे छगन भुजबळ यांनी विचारला. या प्रश्नने शरद पवारच अडचणीत आले. त्यामुळेच ते लोकसभेसाठी ज्येष्ठ मंत्र्यांना फार आग्रह करू शकले नाहीत. शिरूरमधून दिलीप वळसे पाटील अन हातकलंगणेमधून जयंत पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी पवारांची इच्छा होती पण दोघेही त्यासाठी तयार नव्हते.

अखेर शिरूरमधून सारख कारखान्याच्या अध्यक्षांना रिंगणात उतरवावे लागले त्याचबरोबर हातकलंगणेमध्ये उमेदवार मिळत नसल्याने तो मतदारसंघ अखेरच्या क्षणी सोडण्याची नामुष्की पवारांवर आली. मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्याचे फायनल झाले होते पण बेकायदा बांधकामांना संरक्षण देणारा आदेश न काढल्याने जगताप यांनी उघडपणे राष्ट्रवादीचे तिकीट नाकारले. इतकच नाही तर आता त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवण्याचे जाहीर करून पवारांनाच आव्हान दिले आहे.

माढातून माघार का घेतली?
या निवडणुकीच्या अगोरद शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले. मागच्यावेळी माढा मतदारसंघातून पवार यांनी निवडणूक लढवली होती अन विजयसिंह मोहितेपाटील यांच्यामुळे ती जिंकली. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयसिंह मोहीतेपाटील पराभूत झाले. त्याचा राग मोहितेपाटील समर्थकांच्यात होता. त्यामुळे यावेळी पवार पुन्हा माढा मतदारसंघातून उभे राहिले तर त्यांना पाडण्याची तयारी मोहितेपाटील समर्थकांची होती. तसेच प्रतापसिंह मोहितेपाटील यांनीही माढातून अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. या कारणांमुळे माढा मतदारसंघात पवारांना अनुकूल नव्हे तर प्रतिकूल वातावरण असल्याचा अहवाल सर्वेक्षणाचा आला. त्यामुळे यावेळी पवारांनी त्यांच्या हातात होते तेवढेच केले अन स्वत: ला राज्यसभेची उमेदवारी घेतली. बारामतीतही सुप्रिया सुळे यांना पूर्णत: अनुकूल वातावऱण नसल्याने तेथे पवारांना लक्ष घालावे लागणार आहे.

केद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची राजकीय व सामाजिक जीवनातील 46 वर्षांची तपश्चर्या आहे. त्यांनी अनेकांना पद देऊन मोठं केलं. तसंच राजकीय विरोधकांना सर्व मार्गांचा वापर करत घरीही बसवल्याची अनेक उदाहरणे आहेत. पुणे जिल्ह्यातील स्व. वसंतदादांचा खंदे समर्थक अनंतराव थोपटे यांना त्यांनी पायशी आणून बसवलेच. त्यामुळेच शरद पवारांचा शब्द झेलण्यासाठी कार्यकर्ते तत्पर असत. पण आता पिढी बदलल्याने यंदा कार्यकर्त्यांनी पवारांना शब्द नाकारण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे पवारांना हेची का फळ मम तपाला या जुन्या नाट्यगीताची आठवण झाल्याशिवाय रहाणार नाही. अनुकूल वातावऱण नसल्याने तेथे पवारांना लक्ष घालावे लागणार आहे.केद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची राजकीय व सामाजिक जीवनातील 46 वर्षांची तपश्चर्या आहे. त्यांनी अनेकांना पद देऊन मोठं केलं. तसंच राजकीय विरोधकांना सर्व मार्गांचा वापर करत घरीही बसवल्याची अनेक उदाहरणे आहेत. पुणे जिल्ह्यातील स्व. वसंतदादांचा खंदे समर्थक अनंतराव थोपटे यांना त्यांनी पायशी आणून बसवलेच. त्यामुळेच शरद पवारांचा शब्द झेलण्यासाठी कार्यकर्ते तत्पर असत. पण आता पिढी बदलल्याने यंदा कार्यकर्त्यांनी पवारांना शब्द नाकारण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे पवारांना हेची का फळ मम तपाला या जुन्या नाट्यगीताची आठवण झाल्याशिवाय रहाणार नाही.

Leave a Comment