सांगली कोल्हापुरात मोदींची सभा होणार?

कोल्हापूर – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सांगली आणि कोल्हापूर येथे सभा घ्यावी यासाठी नेते चंद्रकांतदादा पाटील प्रयत्नशील असल्याचे समजते. कोल्हापूरातून गेल्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले सदाशिवराव मंडलीक यांचा मुलगा संजय मंडलिक यांना यावेळी शिवसेनेने उमेदवारी दिली आहे तर सांगलीत राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने संजयकाका यांना उतरविले आहे. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी भागात गुजराथी, सिंधी, जैन, उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे आणि मोदींची सभा येथे झाली तर युतीला मोठाच फायदा मिळू शकणार आहे असे सांगितले जात आहे.

माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धडा शिकविणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या निवडणुकीत हार पत्करावी लागल्यानेच पवार यांनी कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली आहे. त्यासाठी मोदींची भीतीही घातली आहे. गेल्या वेळी मी अपक्ष म्हणून लढूनही जिंकलो, यंदा तर आमच्यासोबत महायुती आहे असेही ते म्हणाले.

Leave a Comment