
सध्या लोकांना योगाचे महत्व पटत चालले आहे. त्यामुळे रोज योगासने, प्राणायाम करणार्यांची संख्या वाढत चालली आहे. सामान्यत: योगशास्त्राकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन वरवरचा असतो. शरीरस्वास्थ्य राखण्याचे एक साधन म्हणून ते योगाकडे पहात असतात. एका अर्थाने ते खरे आहे, परंतु सर्वार्थाने खरे नाही. योगमार्ग हा केवळ शरीरासाठी नसून मनासाठी, आत्म्यासाठी आणि बुद्धीसाठीही आहे. याची जाणीव ठेवूनच नवागतांनी योगाकडे वळले पाहिजे. योगाची उपासना करताना खालील पथ्ये पाळणे ङ्गार आवश्यक आहे. आपण ज्यांच्याकडे योगाचे शिक्षण घेणार आहोत त्यांच्याशी चर्चा करावी आणि आपले आरोग्यविषयक प्रश्न त्यांना सांगावेत. तसे झाल्यास ते शिक्षक आपण कोणती आसने केली पाहिजेत आणि कोणती आवर्जून टाळली पाहिजेत हे सांगू शकतात. योगासने आणि प्राणायाम ङ्गायद्याचा असतो हे खरे, परंतु सगळ्याच प्रकारची योगासने आणि प्राणायाम सर्वांनाच उपयुक्त नसतात. त्यांची निवड आपल्या प्रकृतीप्रमाणे करावी लागते. एखादा रुग्ण एकाच डॉक्टरावर विश्वास न टाकता वारंवार डॉक्टर बदलत असतो. अशा डॉक्टरांच्या बाबतीत इंग्रजीमध्ये एक उक्ती आहे. तिच्यात असे म्हटले आहे की, आपण तीन डॉक्टरांचे सल्ले घेतो तेव्हा त्यातला एक औषधाची चिठ्ठी देतो, दुसरा डॉक्टर अभिप्राय देतो आणि तिसरा डॉक्टर मरणाची वाट दाखवतो.
एकंदरीत वारंवार डॉक्टर बदलू नका, असे सांगितले जाते. योगाच्या बाबतीतही हे खरे आहे. एकदा एक गुरु केला तर तोच कायम ठेवावा. लोकांना वारंवार गुरु का बदलावासा वाटतो, याचाही शोध घेतला आहे. लोकांना आरोग्याच्या काही तरी तक्रारी असतात आणि त्यासाठी योगासने आणि प्राणायाम करायला लागतात. मात्र आठवडा किंवा पंधरवड्यात गुण नाही आला की, ते गुरु बदलतात. योगोपचाराचा गुण इतक्या लवकर येत नसतो. ङ्गारच सावकाश येत असतो, मात्र नक्की येत असतो आणि तो येईपर्यंत धीर धरला पाहिजे आणि सावकाशीने येणार्या गुणाकडेही लक्ष दिले पाहिजे. योगासने करताना घट्ट कपडे घालता कामा नये, सैल कपडे घालावेत. रंगीत कपड्यांनी प्राणिक शक्तीच्या वहनात अडथळा येत असतो आणि असे कपडे घालणार्यांना योगासने आणि प्राणायामाचा पुरेसा ङ्गायदा होत नाही.
योगासने करण्यापूर्वी आंघोळ करावी. अशुद्ध शरीराने योगासने आणि प्राणायाम करू नयेत. स्नानापूर्वी केलेल्या योगासनांपेक्षा स्नानानंतर केलेल्या योगासनांचा जास्त ङ्गायदा होतो. काही कारणांनी योगासनांपूर्वी स्नान करणे शक्य होत नसेल तर योगासनानंतर किमान अर्धा तास तरी स्नान करू नये. योगासनापूर्वी काही खाऊ नये. खाणे आवश्यकच वाटत असेल तर योगासने सुरू करण्यापूर्वी ३० मिनिटे एखादे ङ्गळ खावे. योगासनानंतर १५ मिनिटे काही खाऊ नये. योगासने करताना अंगावर सेंट ङ्गवारलेला असू नये. त्याचा श्वसनावर परिणाम होत असतो. मोबाईल ङ्गोन आणि अशीच साधने स्वत:पासून दूर ठेवावीत. ङ्गॅनखाली योगासने करू नयेत. योगासनाच्या वर्गाला जाताना स्वत:ची चटई स्वत: घेऊन जावी. इतरांचे आसन वापरू नये. योग क्लासला आलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना विचलित करू नये. योग हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि जीवन पद्धती आहे. तो केवळ शरीर सौष्ठव साध्य करण्याचा मार्ग नाही.