विराट कोहली आयसीसी क्रमवारीत अव्वलस्थानी

दुबई: टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीने आयसीसी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. आशिया चषकाच्या समाप्तीनंतर आयसीसीने वन डे खेळाडूंची रँकिंग जाहीर केली. यामध्येि विराटने पहिले स्थारन पटकाविले आहे. गेल्या काही दिवसांपासून या क्रमवारीत विराटने त्यायचे अव्वेलस्थालन टिकवून ठेवले आहे.

नुकत्याच बांग्लादेश विरूद़धच्या आशिया चषकाआधी विराट कोहली दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सपेक्षा दोन अंकांनी पिछाडीवर होता. त्यानंतर मात्र त्याने पहिल्या स्थानावर कब्जा केला. कोहलीने स्पर्धेत तीन डावात १८९ धावा केल्या आणि बांग्लादेशविरुद्धची १३६ धावांची खेळी सर्वोच्च होती. या स्पर्धेमुळे कोहलीला १२ अंक मिळाल्याने त्याने डिव्हिलियर्सवर ९ अंकांची आघाडी घेतली आहे.

आशिया चषकात बांग्लादेशविरुद्ध १३६ धावांच्या खेळीनंतर कोहलीने करिअरमधील सर्वोच्च ८८६ अंकांनी कमाई केली होती. पण श्रीलंकेविरुद्ध ४८ आणि पाकिस्तानविरुद्ध पाच धावांच्या खेळीमुळे त्याचे अंक ८८१ झाले. तर अफगाणिस्तानविरोधात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. जानेवारीमध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे सामन्यांआधी कोहली नंबर वन फलंदाज होता. विराट कोहलीशिवाय टीम इंडियाचे शिखर धवन आठव्या, रोहित शर्मा २२व्या आणि रवींद्र जाडेजा ५०व्या स्थानावर आहेत.

Leave a Comment