मुंबई: आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींच्या विरोधात उमेदवार सापडला नही: तर दुसरीकडे येथील निवडणूक लढविण्याीस ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी नकार दिल्यािने हर जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला देऊन टाकली आहे. आगामी काळात आता या जागेवर आता काँग्रेसचे कलाप्पाण्णा आवाडे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
हातकणंगले मतदारसंघातून गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीकडून तगडया उमेदवाराचा शोध सुरू होता. मात्र त्यांना उमेदवार शोधूनही मिळाला नाही. ऐनवेळी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचे नाव पुढे आले होते. मात्र त्यांनी त्या ठिकाणहून निवडणूक लडविण्या स्पष्ट शब्दात नकार दर्शविला आहे.
यामुळे राष्ट्र्वादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही जागा सोडण्याची नामुष्की आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कित्येक दशके राजकारण करणा-या पवारांसाठी हा मोठा सेटबॅकच म्हणायला हवा. त्यामुळे आता दोन्ही पक्षांना २२-२६ असा फॉर्म्युला असला तरी राष्ट्रवादी केवळ २१ च जागा लढवणार असल्याचे समजते.