सोनी विकणार टोकियोतील मुख्यालय

टोकियो- जपानची इलेक्ट्रॅनिक उत्पादने करणारी नंबर १ ची कंपनी सोनी कॉर्प त्यांची प्रतिष्ठेची समजली जाणारी टोकियोतील मुख्यालयाची जागा विकणार असल्याचे वृत्त आहे. कंपनीला कांही दिवस सातत्याने कमी नफा मिळत आहे. नफ्यातील घट भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगितले जात आहे.

गेली ६० वर्षे टोकियोतील या इमारतीत सोनीचे मुख्यालय आहे. किंबहुना सोनी कंपनीचा जन्मच या इमारतीत झाला आहे आणि त्यामुळे कंपनीसाठी ही जागा विशेष आहे. जपानमधील रियल इस्टेट क्षेत्रातील कंपनी सुमितोनो रिअॅलिटी अॅन्ड डेव्हलपमेंट यांना सोनी ही इमारत विकणार असून त्यासाठी १६.१ अब्ज येन म्हणजे साधारण १५.७ कोटी डॉलर्स इतकी रक्कम सोनीला मिळणार आहे. हा व्यवहार पुढच्या महिन्यात पूर्ण होईल असेही समजते.