
पुणे, – प्राथमिक व पूर्व प्राथमिकचे 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे काम पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर लगेचच प्रवेश प्रकि‘या सुरु करण्यात येईल अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त एस.चोकलिंगम यांनी दिली. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत समाजातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या 25 टक्के राखीव गटांवरील प्रवेश प्रक‘ीया यंदा पुणे व मुंबई येथे प्रायोगिक तत्वावर राबविली जाणार आहे. यासाठी पुणे व पिंपरी चिंचवडमधील मिळून 500 शाळा आहेत अशी माहिती प्राथमिकचे शिक्षण संचालक माने यांनी दिली होती. ऑनलाईन राबविण्यात येणार्या या प्रवेश परीक्षांसाठी शाळांची माहिती सीडॅकच्या वतीने तयार करणार्या सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्याचे काम सुरु असून आतापर्यंत बहुतांशी शाळांची माहिती अपलोड करुन झाली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, शाळांची माहिती भरण्याचे काम हे निम्म्याहून अधिक प्रमाणात झाले आहे. पुढील अठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होईल व त्यानंतर लगेचच अर्ज भरण्यास सुरुवात केली जाईल. 25 ट्नके प्रवेशाचे ऑनलाईन प्रवेश हे यंदाच्या वर्षी प्रायोगिक तत्वावर राबविले जात असून यावर्षी त्याला काहीसा उशीर झाल्याचे त्यांनी याआधीच मान्य केले होते. मात्र आता लवकरच पालकांची प्रतिक्षा संपणार आहे.
