ब्लॅकबेरी झेड १० फोन चा स्टॉक संपला

ब्लॅकबेरी कंपनीने त्यांच्या झेड १० या स्मार्टफोनच्या किमती उतरविल्यानंतर कांही काळातच हे फोन पूर्णपणे विक्री केले गेले असून सध्या फोनचा नवीन स्टॉक बाजारात येण्यासाठी कांही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ब्लॅकबेरीच्या प्रवक्तयाने फोन सोल्ड आऊट झाल्याची खबर ईमेल ने दिली आहे. दोन टप्यात या फोनच्या किमतीत ६० टक्के घट केली गेली होती.

ब्लॅकबेरीने भारतात दोन टप्प्यात झेड १० च्या किमती कमी केल्या होत्या. वर्षापूर्वी जेव्हा हा फोन बाजारात आला तेव्हा त्याची किमत होती ४३,९९० रूपये. त्यानंतर सप्टेंबर २०१३ मध्ये या फोनच्या किमती कमी करून २९,९९० वर आणल्या गेल्या. त्यानंतर पुन्हा २५ फेब्रुवारी २०१४ ला या किमती आणखी उतरवून त्या १७,९९० वर आणल्या गेल्या. त्यामुळे ग्राहकांकडून असलेली मागणी एकदम वाढली आणि स्टॉक संपुष्टात आला असे सांगितले जात आहे.