शिवसेनेचा युती तोडण्याचा इशारा

मुंबई: सोमवारी दुपारी भाजप नेते नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. या कारणामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतापले आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळेच सोमवारी रात्री उशीरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेवून समजूत काढली असल्याचे समजते. देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री मातोश्रीवर दाखल झाले. त्यानंतर या दोघांमध्ये रात्री एक वाजेपर्यंत चर्चा झाली.

सोमवारी नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतल्या फोर सीझन या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुमारे दोन तास चर्चा केली. त्यानंतर एका न्युज चॅनेलला मुलाखत दिली मुलाखतीत त्यांने राज ठाकरे आणि शरद पवार या दोघांचेही कौतुक केले आहे. या चर्चेदरम्यानही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि गडकरींमध्ये सुरु असलेल्या गुफ्तगूवर नाराजी व्यक्त केली. इतकेच नाही तर यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या केंद्रीय पक्षनेतृत्त्वाशी फोनवरून बातचित केली.

त्यामुळे आगामी काळात नितीन गडकरी यांच्या राज ठाकरे भेटीमुळे व मनसेशी जवळीकतेमुळे महायुतीला तडा जाणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्या‍मुळे आगामी काळात काय घडणार यासाठी थोडीसी वाट पहावी लागणार आहे.

Leave a Comment