राहुल ५-६ मार्चला महाराष्ट्रात

मुंबई – काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रचारप्रमुख राहुल गांधी येत्या ५ व ६ मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येत असून ते या दौर्‍यात धुळे जिल्ह्यातील आदिवासी आणि वर्सोवा येथील कोळी समाजाशी संवाद साधणार आहेत असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. राहुल यांच्या या दौर्‍यात महाराष्ट्राचे प्रभारी व महासचिव मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, राष्ट्रीय सचिव बाल बच्चन त्यांच्याबरोबर असतील.

पाच मार्चला सकाळी राहुल धुळे शिरपूर दौरा करणार आहेत. यावेळी ते आदिवासी भागातील इंजिनिअरिंग व पदवी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. औरंगाबाद व धुळ्यात ते जनसंपर्क करणार आहेत. ६ मार्चला मुंबईतील वर्सोवा येथील कोळी समाजातील लोकांशी ते संवाद साधणार आहेत आणि दुपारी भिवंडी बायपास जवळ असलेल्या सोनाले गावात सभा घेणार आहेत. राहुल यांचा महाराष्ट्र दौरा निवडणुकांच्या संदर्भात विशेष महत्त्वाचा ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment