गुगल आणणार कस्टमाइज्ड स्मार्टफोन

वेलिग्टन – गुगल त्यांच्या आरा प्रकल्पाखाली पुढच्या वर्षाच्या सुरवातीला कस्टमाझेबल मॉड्युलर स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. हा फोन युजरला त्याच्या गरजेनुसार सहज मॉडिफाय करता येईलच पण थ्री जी, फोर जी मोबाईल नेटवर्क नसलेला व केवळ वायफाय कनेक्ट असलेला हा पहिलाच फोन असेल असे सांगितले जात आहे. या फोनची किंमत ५० डॉलर्सच्या आसपास असेल असे समजते.

हा फोन २०१५ च्या सुमारास बाजारात येईल आणि तो मिनी, मिडीयम व जंबो अशा तीन आकारात उपलब्ध करून दिला जाणार आहे. पॉल इरेकमेन्को यांनी या फोनच्या निर्मितीत पुढाकार घेतला असून युजर या फोनला वेगवेगळी मॉड्यूल्स कनेक्ट करू  शकतील असे त्यांचे म्हणणे आहे.