वॉशिग्टन- अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा मार्च १९ ते २६ या दरम्यान चीनच्या भेटीवर जात असल्याचे व्हाईट हाऊसकडून जाहीर केले गेले आहे. मिशेल यांच्यासोबत त्यांची आई मरियन रॉबिनसन तसेच मुली मलिया आणि साशा याही जाणार आहेत.

मिशेल या भेटीत बिजिंगमधील विद्यापीठ आणि हायस्कूलना तसेच चेंगडू येथील हायस्कूलना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. मार्च २० ते २३ पर्यंत त्यांचा बिजिगला मुक्काम असेल तर २४ मार्चला झिआन आणि २५-२६ मार्चला चेंगडू येथे त्या भेट देणार आहेत. चीनमधील महत्वाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळेही त्या पाहणार आहेत.
मिशेल यांचा हा दौरा शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी असून त्यात त्या विद्यार्थ्यांशी त्यांच्या विद्यार्थीदशेतील अनुभव शेअर करणार आहेत. जगात शिक्षण क्षेत्रात एकमेकांशी देवाणघेवाण करण्याचे महत्त्वही त्या यावेळी विद्यार्थ्यांना पटवून देणार आहेत असे समजते.