महायुतीतील माढ़याचा तिढा अखेर सुटला

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून महायुतीत माढा मतदारसंघ कोणाकडे यावरून वाद रंगला होता. शनिवारी रात्री उशिरा झालेल्याम महायुतिच्या बैठकित हा माढयाचा तिढा अखेर सुटला आहे. आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकी आता माढा मतदारसंघातून स्वाढभिमीनी शेतकरी कामगार संघटनेचे सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे. तर बारामती मतदारसंघातून रासपचे महादेव जानकर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

महायुतीच्या पदाधिका-यांच्या शिबिरात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईत जागावाटप पूर्ण झाल्याीची घोषणा त्यांतनी केली. महायुतीच्या शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माढ्यातून शेतकरी कामगार संघटनेचे सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माढा मतदारसंघातून यापूर्वीही सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवली होती.

माढा मतदारसंघातून इच्छुक असलेले महादेव जानकर बारामतीमधून सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. महादेव जानकर यांनी लोकसभेच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली होती. तसेच साता-याची जागा रामदास आठवलेंच्या आरपीआयसाठी सोडण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, महादेव जानकर बारामतीमधून लढण्यासाठी सिद्ध झालेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना हारवून ‘जायंट किलर’ व्हायची आपली इच्छा असल्याचे जानकर म्हणाले तर खोत यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment