मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्दा गाजत आहे. या संदर्भातील अहवाल सादर करणा-या नारायण राणे समितीने अनुसूचित जाती आणि जमातींच्या उन्नतीसाठीचा निधी लाटल्याचा आरोप होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातील कर्मचा-यांचा आणि सुविधांचा या अहवालासाठी वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रासाठी जाहीर केलेला निधी हा अनुसूचित जाती आणि जमातींच्या उन्नतीसाठी आहे. हा निधी दुस-या कोणत्याही कामासाठी वापरला जात नाही. याच निधीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे काम चालते. पण याच केंद्रातील सुविधांचा आणि कर्मचा-यांचा वापर करून मराठा आरक्षणाच्या अहवालाचे काम केल्याचे आता समोर आले आहे.
त्यामुळे एका स्कीमचा पैसा दुस-या कामासाठी कसा वापरला आणि असा पैसा वळवणा-यावर काही कारवाई होणार का….? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगमी काळात त्यांरच्याीवर राज्य शासनाकडून काय कारवाई करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.