छगन भुजबळ, सुरेश कलमाडी अडचणीत

मुंबई – कामात अनियमितता झाल्याचा ठपका विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने ठेवल्याकने सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ अडचणीत आले आहेत. दुसकरीकडे पुण्याठचे खासदार सुरेश कलमाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापमुळे छगन भुजबळ, सुरेश कलमाडी अडचणीत सपाडले आहेत. विधानसभेत हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

नवी दिल्लीचे महाराष्ट्र सदन तसेच मुंबईत अंधेरीचं आरटीओ कार्यालय आणि हायमाऊंट स्टेट गेस्ट हाऊसच्या कामात अनियमितता झाल्याचा ठपका विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने ठेवला आहे. याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. त्या मुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ अडचणीत आले आहेत.

तर कलमाडी यांनी कामाचा दर्जा, टेंडरशिवाय दिले गेलेले कंत्राट तसंच शासनाला यातून काही फायदा झाला नसल्याचा ठपका समितीनं ठेवलाय. दुसरीकडे युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील काही स्पर्धांशी संबंधित आयोजन समितीवर खटले दाखल करण्याची शिफारसही लोकलेखा समितीनं केली. त्यामुळे या स्पर्धा घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडींविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

Leave a Comment