शरद पवारांमुळेच मी तुरूंगात: विंदू

नवी दिल्ली – शरद पवार साहेबांच्या दबावामुळे आणखी काही दिवस तुला तुरूंगात रहावे लागेल, असे पोलीसच म्हणाले असल्याचा खळबळजनक आरोप आयपीएल सट्टेबाज प्रकरणातील दोषी विंदू दारा सिंग याने केला आहे. या संबंधीचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रातून देण्यात आले आहे. आयपीएलमधील खरी स्पर्धा ही बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन आणि माजी आयपीएल अध्यक्ष ललीत मोदी यांच्यात होती, असे विंदूने सांगितले आहे. आम्ही तर काहीच केलेले नाही तरी आम्हाला यात गोवण्यात आले. खरे तर या प्रकरणी ललीत मोदी आणि श्रीनिवासन यांचीच चौकशी झाली पाहिजे, असेही विंदूने सांगितले आहे.

माझा सट्टेबाजीप्रकरणात काही हात नाही असे केवळ माझे म्हणने आहे, असे नाही. तर खुद्द पोलिसांनीच मला तसे सांगितले आहे. मात्र पवार साहेंबांच्या दबावाखाली असल्याने पोलीस मला सोडत नाही, असेही पोलिसांनी सांगितल्याचे विंदूने सांगितल्याचे या इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तात म्हटले आहे. तसेच माझा फिक्सिंगमध्ये काहीच हात नसल्याचे खुद्द पोलिसांनी मला सांगितले पंरतु, शरद पवार साहेबांच्या दबावामुळे आणखी काही दिवस किंवा महिनाभर तुला तुरूंगात रहावे लागेल असे पोलीसच म्हणाले असल्याचा आरोपही विंदूने केला आहे. आयपीएलमध्ये फिक्सिंग होते शंभर टक्के खरे आहे आणि यामध्ये संघांच्या मालकांचा हात होता. विजय मल्ल्यांनीही कोट्यवधी रुपयांचा सट्टा खेळला आणि सुमारे २०० कोटीची रोकड जमा केली आहे, असे विंदूने सांगितल्याचे वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment