संजय दत्त : मुंबई पोलिसांची पॅरोलवाढीची शिफारस

पुणे, – मुंबई बॉम्बस्मोटातील आरोपी संजय दत्तला पुन्हा एकदा पॅरोल मंजूर करावा, अशी शिमारस मुंबई पोलिसांनी पाठविलेल्या अहवालात केली आहे. मुंबई पोलिसांनी पाठविलेला अहवाल पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आला असून परंतू दत्तच्या पॅरोलबाबत निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

मुंबईतील 1993 बॉम्बस्मोट प्रकरणातील अवैधरीत्या शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. येरवडा तुरूंगात संजय दत्त शिक्षा भोगत आहे. तुरूंगात दाखल झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये वैद्यकीय कारणासाठी संजय दत्त 14 दिवस संचित रजेवर बाहेर आला होता. त्यानंतर त्याची रजा पुन्हा 14 दिवसांनी वाढविण्यात आली. संजय दत्त एक महिन्याची सुट्टी संपवून 30 ऑक्टोबरला तुरूगांत दाखल झाला होता. पण एक महिन्याच्या आत संजय दत्तने पत्नीच्या आजाराचे कारण सांगून पुन्हा सुट्टी मागितली होती. नियम 1959 च्या अंतर्गत 19 उपनियमांतर्गत अभिवचन रजा देण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना आहे. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी डिसेंबरमध्ये दत्तची पॅरोलची रजा 6 डिसेंबरला मंजूर केली होती. त्यानंतर पुन्हा संजय दत्तने 30 दिवसांचा पॅरोल वाढवून देण्याचा अर्ज केला. त्यावर 21 जानेवारी ते 21 मेब्रुवारी पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी दत्तला पॅरोल मंजूर करण्यावरून बरीच चर्चा झाली होती.

संजय दत्तने आता पुन्हा 30 दिवसांची वाढीव पॅरोल रजा मागितली आहे. मुंबई पोलिसांनी दत्तला तिसर्यां दा पॅरोल देण्याची शिमारस करणारा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त देशमुख हे दिल्लीला गेले असल्याने ते परतल्यावरच पॅरोलबाबत निर्णय होणार आहे.