
मुंबई – बांगलादेशमध्ये होणा-या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. न्यूझीलंड दौ-यात खराब कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला संघातून डच्चू देण्यात आला असून, युवराज सिंगने संघात पुनरागमन केले आहे. न्यूझीलंड दौ-यात फारशी संधी मिळू न शकलेल्या स्टुअर्ट बिन्नी आणि मोहित शर्मालाही विश्वचषक संघात स्थान देण्यात आले आहे.
