पाकचा क्रिकेटपटू उमर अकमलला अटक

लाहौर- पाकिस्तानी क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज उमर अकमलला पोलिसांनी अटक केली आहे. लाहौरमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अकमलला अटक करण्यात आली असल्यालचे समजते. त्याला लाहोर येथील तुरुंगात ठेवाण्यात आले आहे. त्या‍ला अटक करण्यात आली असल्याने पाकिस्तातन क्रिकेट बोर्डाकडून त्याच्यावर शिस्ताभंगाची काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी क्रिकेटपटू उमर अकमलने आपल्या श्रीमुखात वाहतूक पोलिसाने भडकावल्याचा आरोप केला आहे. याबाबत अधिक बोलताना उमर अकमल म्हणला, पोलिसाचे वागणे मला योग्य वाटले नाही. त्याची तक्रार द्यायला आपण पोलिस स्टेशनला गेलो, तर आपल्याला अटक करण्यात आली.

मात्र एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार उमर अकमलला पोलिसाने थांबवले, कारण की उमरने सिग्नल तोडला होता. मात्र त्याने पोलिसाना सहकार्य करण्यााऐवजी त्यानी पोलिसांना शिव्या दिल्या आणि शर्टही फाडला. त्यामुळेच त्याअला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास आल्याानंतर अटक करण्याात आली.

Leave a Comment