उध्दव ठाकरे करणार घोसाळकरांवर कारवाई

मुंबई- शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे, शुभा राऊळ आणि भाजपाच्या नगरसेविका मनिषा चौधरी यांनी आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधातील तक्रार शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ऐकून घेतली आहे. आगामी काळात चौकशी करून आमदार घोसाळकरांवर कारवाई करण्याचे अश्वा्सन त्यांनी भेटीवेळी दिले आहे.

तीन नगरसेविकेच्या तक्रारीमुळे गेल्याळ काही दिवसात पालिका ढवळून निघाली होती. सार्वजनिक प्रसाधनगृहावर नगरसेविकांचा मोबाइल क्रमांक लिहिणे, फेसबुकवरून त्यांना धमकी देणे असे प्रकार होत असल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेविकांनी केल्यावर गहजब उडाला होता. या प्रश्नावरून पालिका सभागृहातही गोंधळ सुरू झाला. मात्र पक्षप्रमुखांनी तरीही नगरसेविकांना दूरच ठेवले.
अनेकदा प्रयत्न करूनही पक्षप्रमुख भेटीची वेळ पुढे ढकलत राहिले.

दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे सर्व म्हणणे ऐकून घेतले व कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे गेला महिनाभर मनावर असलेला ताण निवळला आहे. आम्ही पक्षासोबतच आहोत, पक्ष देईल ती कामगिरी आनंदाने पार पाडू, असे नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सांगितले. योग्य वेळ आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिल्याचे समजते. मात्र योग्य वेळ निवडणुकांपूर्वी येणार की नंतर ते स्पष्ट झालेले नाही. मात्र तूर्तास तरी नगरसेविकांच्या विषयावर पडदा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment