अभिनेता नाना पाटेकर यांची राजकीय पक्षात जाण्यास ना – ना

औरंगाबाद – सामाजिक कार्यकर्ते, शासकिय अधिकाºयांपासून थेट अभिनेत्यांपर्यंत सर्वांनाच राजकारणाचे वेध लागले असतांना आपला मराठमोळा नाना मात्र राजकारणाला नकार देतो आहे.. हो कारण आज औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या नाना पाटेकरने राजकारणात जाण्यास नकार दिला. ह्लमला निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षाकडून आॅफर्स आहेत, पण मी कोणत्याही पक्षात जाणार नाहीह्ल असे नाना पाटेकरने स्पष्ट केले.

माझ्या तोंडामुळे मी ज्या पक्षात जाईल त्यांची अडचण होईल आणि असे करत-करत शेवटी सर्व पक्ष संपतीलह्ल असा टोला नानाने हाणला आहे. नानाचे अनेक नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे अनेक वेळा नाना नेत्यांबरोबर स्टेज शेअर करतो. पण नेत्यांची आपले संबंध केवळ मैत्रीपुरतेच ठेवण्याचा नानाचा विचार आहे. त्यामुळे राजकारणात जाण्यासाठी अनेकांची अथक प्रयत्न सुरू असतांना नाना पाटेकर यांनी मात्र राजकारणापासून चार हांत लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यंत स्पष्टवक्ता अशी नानाची ओळख आहे. त्यामुळे आपली ही वृत्तीच राजकारणात अडसर ठरत असल्याचे जरी नाना सुचवण्याचा प्रयत्न करत आहेत.