याहू सीईओ मेयर यांची संपत्ती ३१ कोटी डॉलर्सवर

इंटरनेट सेवा प्रोव्हायडर याहूचा व्यवसाय वाढीसाठी जोरदार संघर्ष सुरू असला तरी याहूच्या सीईओपदी विराजमान असलेल्या मेरिसा मेयर यांची संपत्ती मात्र वाढली असल्याचे वेल्थ एक्स ग्लोबल संस्थेने जाहीर केले आहे.

वेल्थएक्स ग्लोबल ही जागतिक कंपनी जगातील अर्थविषयक माहिती गोळा करून ती प्रसिद्ध करते. या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार मेरिसा यांची संपत्ती या वर्षात ३१ कोटी डॉलर्सवर जाणार आहे. मेयर यांच्या संपत्तीचा अंदाज त्यांचेकडे असलेले  शेअर्स, स्टॉक्स, त्यांची गुंतवणूक व स्थावर मालमत्ता यांच्या माहितीवर आधारित असल्याचेही सांगितले जात आहे.