पान पराग इंडियाने चुकविला २० कोटींचा कर

बडोदा – पान पराग इंडिया कंपनीने करचुकवेगिरी केल्याचे प्रकरण महसूल विभागाच्या नजरेस आले आहे. बडोदा येथील कंपनीच्या उत्पादन प्रकल्पात फलेवर्ड सुपारीच्या उत्पादनासाठी परवानगी घेऊन बसविण्यात आलेल्या ८ मशीन्समधून पानपरागचेच उत्पादन केले गेले असल्याचे आढळले आहे. यातून कंपनीने २० कोटी रूपयांचे उत्पादन शुल्क चुकविले आहे.

पान मसाल्यावर जादा उत्पादन शुल्क आकारले जाते. त्यामुळे हे शुल्क वाचविण्यासाठी फलेवर्ड सुपारीचे उत्पादन करण्यासाठी मशीन्स बसविल्याचे कंपनीने दाखविले होते. यापूर्वीही कंपनीत असे प्रकार घडले आहेत असेही समजते. महसूल विभागाने कंपनीला कारणे दाखवा नोटीसा दिल्यानंतर कंपनीने १० कोटी रूपये करापोटी जमा केले आहेत असे समजते.

Leave a Comment