अरूण भाटियांचे लोकसभेसाठी समर्थनाचे आवाहन

पुणे – माजी प्रशासकीय अधिकारी आणि पुणे महापालिकेचे माजी आयुक्त अरूण भाटिया यांनी लोकसभेसाठी समर्थकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन पुणेकरांना फेसबुकवरून केले आहे. भाटिया यांनी १३ जानेवारीलाच आम आदमी पक्षांतर्फे निवडणूक लढविण्यासाठीचा अर्ज पक्षाकडे केला आहे. मात्र या अर्जात किमान ६०० समर्थकांचा पाठिबा हवा अशी अट असल्याने भाटिया यांनी फेसबुकवर पाठिबा देण्याचे आवाहन केले आहे.

भाटिया यांनी २००४ आणि २००९ सालची लोकसभाही लढविली होती. भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. यंदा त्यांता आम आदमी कडून निवडणुक लढविण्याची इच्छा आहे मात्र आमच्या समन्वयक अंजली दमानिया यांनी उमेदवाराची निवड अद्याप झाली नसल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की आमच्याकडे आलेल्या अर्जावर चर्चा सुरू असून उमेदवाराची निवड लवकरच जाहीर केली जाईल.

Leave a Comment