मोदीं सरकार आल्यास भारतीय अर्थव्यवस्था सुधारेल- मूडीज

जागतिक गुंतवणूक व रेटींग एजन्सी मूडीने भारतात आगामी निवडणुकांनतर मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले तर भारताच्या अर्थव्यवस्थेला चांगला फायदा होईल असे अनुमान नोंदविले आहे. मोदी सरकारच्या पॉलिसी उद्योगव्यवसायांसाठी अधिक मैत्रीपूर्ण ठरतील व परिणामी भारतातील गुंतवणूकीस चालना मिळेल असे मूडीचे वरीष्ठ अर्थतज्ञ ग्लेन लेव्हीन यांचे म्हणणे आहे.

लेव्हीन म्हणतात, लवकर निवडणुका झाल्या तर भाजपला अधिक जागा मिळण्याची संधी आहे. मात्र बिगर हिंदू मते मिळविणे हे मोदींपुढचे मोठे आव्हान आहे. परिणामी अल्पमतातील सरकार प्रादेशिक पक्षांच्या सहाय्याने स्थापन होण्याचीही शक्यता आहे. मात्र मोदींनी गुजराथमध्ये जसा कारभार चालविला आहे ते पाहता या अडचणींवर मोदी मात करतील असे म्हणता येईल.

मुडीच्या गुंतवणूक सेवा रेटिंग विंगच्या मते भारताची सध्याची अर्थव्यवस्था स्थिर दिसते आहे आणि ती अधिक पडण्याची शक्यता तूर्तास तरी दिसत नाही.