जपानचे पंतप्रधान प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी

जपानचे पंतप्रधान शिजो आबे त्यांच्या पत्नी आको यांच्यासह २५ जानेवारीला तीन दिवसांच्या भारतभेटीवर येत आहेत. यंदाच्या प्रजासत्ताकदिनाचे ते मुख्य अतिथी आहेत. प्रजासत्ताकदिनाला मुख्य पाहुणे म्हणून येणारे जपानचे ते पहिलेच पंतप्रधान आहेत.

या भेटीत शिजो आबे द्विपक्षीय वार्षिक शिखर परिषदेतील कांही प्रमुख मुद्यांबाबत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याशी चर्चाही करणार आहेत. भारत जपान राजनितिक आणि जागतिक सहकार्यासंबंधी ही चर्चा असेल असे समजते. आबे यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भारत जपान संबंधात चांगली सुधारणा झाली आहे. विशेष म्हणजे समुद्रातील बेटांच्या ताब्यावरून चीन जपान यांच्यातील संबंध बिघडले असताना भारत जपान यांच्यातील वाढत्या संबंधाना अधिक महत्त्व प्राप्त झाले असल्याचे तज्ञांचे मत आहे.

जपानचे पंतप्रधापदाचा कार्यभार सांभाळण्याची आबे यांची दुसरी टर्म सुरू आहे. या काळात भारत जपान यांच्यातील व्यापार १८.६१ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. अणुसहकार्याबाबतही दोन्ही देशात बोलणी सुरू आहेत. तसेच दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिर्डार आणि दिल्ली मुंबई रेल्वे कॉरिडॉरच्या बड्या प्रकल्पात जपानची मदत झाली आहे.

Leave a Comment