सुनंदाची मैत्रीण नलिनीने दिली पोलिसांना महिती

नवी दिल्ली- केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. त्यांचा मत्यू हा अनैसर्गीक असल्याचे स्प्ष्ट झाल्यांने याबाबत वेगवेगळी मत व्यक्त केली जात आहेत. मृत्यूपूर्वी काही वेळ अगोदर सुनंदा यांची पत्रकार असलेल्या नलिनी सिंग या मैत्रीणीसोबत फोवनरून चर्चा झाली होती. या चर्चेची संपूर्ण माहिती नलिनी सिंग यांनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे आगामी काळात या मृत्यूचे गूढ रहस्य उलघडण्याची शक्यता आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी माहिती देताना नलिनी सिंग म्ह्णनाल्या, ‘सुनंदा पुष्कर या १६ आणि १७ जानेवारीला खूप डिस्टर्ब होत्या. यावेळी फोनवरून बोलताना सुनंदा पुष्कर यांचा आवाज खूप नैराश्यजनक येत होता. त्या पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार आणि आपल्या नव-याच्या असलेल्या संबंधांवरुन खूपच निराश झाल्या होत्या. १७ जानेवारीला दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी नलिनी सिंग यांचे सुनंदा पुष्करसोबत अखेरचे फोनवरुन बोलणे झाले होते. त्यानंतर बीबीएम आणि मेलवरुनही त्या मेहर तरार आणि शशी थरुर यांच्या संबधाबद्दल बोलत होत्या.’

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचे गूढ उकलावे म्हणून दोघात झालेल्या संभाषणची माहिती आपण पोलिसांना दिली असल्याचे नलिनी यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्यात आणि सुनंदा पुष्करमध्ये झालेल्या संभाषणाच्या आधारावर पोलिस आता या घटना क्रमाचा तपास करीत आहेत. १७ जानेवारीला नवी दिल्लीतल्या हॉटेल लीलामध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह सापडला. हा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे एम्सच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सुनंदा यांच्या शरीरावर जखमा असल्याचेही सांगण्यात आले असल्याने त्यांच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे.

Leave a Comment