न्यूझीलंडकडून टीम इंडिया पराभूत

नेपियर – मॅक्लिन पार्क येथे सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा २४ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने ५० षटकात टीम इंडियाला २९३ धावांचे आव्हान दिले आहे. न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव २६८ धावावर आटोपला. विराट कोहलीच्या शतकानंतर भारताला विजय मिळवता आला नाही.

टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज स्वास्तात बाद झाल्यानंतरसुध्दा एक बाजु लावून धरत विराट कोहलीने १२ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने तो १२३ धावा केल्याच. त्यांनी कर्णधार धोणी याने ४० धावा करीत टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र धोनी बाद झाल्यारनंतर भारताचा डाव लगेचच आटोपला.

त्याआधी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या यजमान संघाने सात गड्यांच्या बदल्यात २९२ धावा केल्या. कोरी अँडरसन ६८ धावांसह नाबाद राहिला. भारताच्या मोहम्मद शमीने चार गडी बाद केले. जडेजा, भुवनेश्वर आणि इशांतने प्रत्येकी एक गडी बाद केला.

टीम इंडियाची सुरूवात निराशाजनक झाली होती. सलामीवीर शिखर धवन लवकर बाद झाला. त्यांनतर रहाणे सात धावा काढून नाथन मॅक्लुमद्वारा झेलबाद झाला. कोरी अंडरसनच्या गोलंदाजीवर मॅक्लुमने रहाणेचा शानदार झेल टिपला. रैनाला पुन्हा एकदा स्वत:ला सिध्द करता आले नाही. अँडम मिलनेने १८ धावांवर रैनाला बाद केले.

Leave a Comment