राजकारणात येणार नाही- सौरव गांगुली

कोलकाता – गेले कांही दिवस भारताचा माजी कप्तान सौरव गांगुली लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होत असली तरी सौरवने मात्र राजकारणात येणार नसल्याचा खुलासा केला आहे. शुक्रवारी सेक्रेटरीएट मध्ये तो आला असता त्याला राजकारणाविषयी प्रश्न विचारले गेले तेव्हा तो बोलत होता.

सौरवला भाजपने लोकसभेत पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती व त्यावर सौरव विचार करत होता. मात्र त्यानंतर त्याने राजकारणापासून दूरच राहायचा निर्णय घेतला आहे. तो म्हणाला, मी खेळाडू आहे, राजकारणी नाही. सेक्रेटरीएटमध्ये तो त्याच्या आगामी शाळा प्रकल्पासंदर्भातील कामाच्या मिनित्ताने आला होता. भाजप नेते वरूण गांधी यांच्याशी एका मित्राच्या माध्यमातून गेल्या वर्षी भेट झाल्यापासून सौरवच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सुरू होती.

Leave a Comment