पुणे रिंग रोडला हिरवा कंदील

पुणे – अनेक वर्षांपासून कागदावर असेलल्या पुणे रिंग रोडला राज्य मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दिलाय. बुधवारी संध्याकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सोयीसुविधा विषयक उपसमितीची बैठक झाली. त्यात हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय प्रलंबित असलेल्या वांद्रे झ्र वर्सोवा सी लिंकला देखील राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पुणे रिंग रोडच्या प्रश्नावरुन गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. पुणे शहराची वाहतूक कोंडी सोडवण्याचा उत्तम पर्याय असलेल्या पुणे रिंग रोडसंदर्भात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांवर वारंवार दबाव येत होता.

Leave a Comment