उत्तम खोब्रागडे लोकसभा निवडणूक लढवणार

मुंबई- बेस्टचे माजी महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांनी लोकसभा निवडणूक असल्याचे जाहीर केले आहे. व्हिसा घोटाळा प्रकरणी अमेरिकेत खटला सुरु असलेल्या भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांचे ते वडील आहेत. खोब्रागडे यांन लोकसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केले असले तरी अद्याप कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालेले नाही.

यासंदर्भात विविध पक्षांसोबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्या पक्षामार्फत निवडणुक लढवणार हे लवकच जाहीर करु असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. व्हिसा अर्जात खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून देवयानी खोब्रागडे यांच्यावर अमेरिकेत खटला सुरु आहे. त्या गेल्याच आठवड्यात भारतात दाखल आहेत. त्याचे मुले पुढील महिन्यात भारतात येतील असे खोब्रागडे यांनी सांगितले.