वॉशिंग्टन/ वृत्तसंस्था – अमेरिकेच्याच नागरिकांना जिहादी प्रशिक्षण देऊन त्यांच्याच देशात घातपाती कारवाया करण्याची जबाबदारी सोपविण्याचे धोरण अल- कायदाशी संलग्न असलेल्या सिरियास्थित दहशतवादी गटांनी अवलंबिले आहे. अमेरिका आणि युपोपिय देशांपुढे हे मोठे आव्हान असून या बाबत काळजीपूर्वक उपाययोजना करण्यात येत असल्याचे एफबीआयच्या प्रवयत्याने सांगितले.
मागील तीन वर्षात सिरियामध्ये अमेरिकेच्या सुमारे सत्तर नागरिकांनी सिरियाला भेट दिली आहे. नेमयया याच कालावधीत सिरियामध्ये यादवी युद्धाचा भडका उडालेला होता. अशा प्रवासी अमेरिकन किंवा युरोपियन नागरिकांपैकी जिहादी चळवळीबाबत सहानुभूती असणा-या अथवा केवळ पैशासाठी भाडोत्री दहशतवादी बनण्याची तयारी असलेल्या व्यक्तींना हेरण्यासाठी दहशतवादी गटांच्या म्होरययांनी पावले उचलली आहेत. सिरियात येणा-या प्रवाशांबरोबरच अमेरिका अथवा युरोपमधील देशात स्थायिक असलेल्या नागरिकांमध्ये आपल्याला हवे असलेले सावज शोधण्यासाठी दहशतवाद्यांनी जाळे पसरले आहे.
अशा प्रकारे अमेरिकेतील अथवा युरोपातील व्यक्तींना शस्त्रास्त्र वापरणे, दहशतवादी कृत्य घडविणे याबरोबरच दहशतवादाच्या जिहादी तत्वज्ञानाचे धडे शिकवून त्यांना कडवे दहशतवादी घडविण्याचा या गटांचा डाव आहे. या दहशतवाद्यांवर त्यांच्याच देशात; म्हणजे अमेरिका आणि युरोपमधील देशातच घातपात घडविण्याची कारवाई सोपविले जाणार असून त्यांच्यावर त्या त्या देशांच्या सुरक्षा यंत्रणांच्या संशयाची सुई येण्याची शययता कमी आहे आणि त्यांना दहसहतवादी म्हणून ओळखणेही अवघड आहे, असा दहशतवादी गटांचा होरा आहे.
अशा प्रकारे नव्या दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी दहशतवादी गटाच्या प्रमुख व्यक्तींनी अनेकदा अमेरिका आणि युरोपचे दौरे केल्याची माहिती एफबीआयच्या हाती लागली आहे. त्यामुळे अशा दहशतवाद्यांना अमेरिकेत येण्यापासून रोखण्याचा; तसेच ते अमेरिकेत आल्यास त्यांना जेरबंद करण्याचा एफबीआयचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर मागील तीन वर्षात सिरियामध्ये जाऊन आलेल्या सत्तर जणांवर एफबीआयची करडी नजर असून त्यांच्या प्रत्येक लहान, मोठ्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. त्यांनी घातपाती कृत्यांचे प्रशिक्षण घेतले असल्याची आणि त्यांच्याकडे धोकादायक शस्त्रास्त्रे असण्याची शययता असल्याने त्यांच्यावर सतत करडी नजर ठेवली जाणार असल्याचेही एफबीआयच्या प्रवयत्याने स्पष्ट केले.