
मुंबई- सेंट्रल रेल्वे मजदूर संघ या युनियनशी संबंधित काही रेल्वे कर्मचा-यांनी गुरुवारी सहाय्यक वाणिज्य प्रबंधक एस. त्रिपाठी यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी प्रशासनाने मोटरमन विवेक सिसोदिया यांचे निलंबन केले. हे निलंबन मागे घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता मध्य रेल्वेच्या मोटरमननी संपाचे हत्यार उपसले.
