मल्लिका साराभाई यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

अहमदाबाद- प्रसिद्ध नृत्यांगना मल्लिका साराभाई यांनी आम आदमी पक्षामध्ये (आप) आज (बुधवार) प्रवेश केला आहे. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये साराभाई या भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्याविरोधात उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

दिल्लीमध्ये ‘आप’ने केलेल्या बदलामुळे अनेकजण ‘आप’मध्ये प्रवेश करू लागले आहेत. ‘आप’मध्ये प्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना साराभाई म्हणाल्या, ‘आप’चे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मी काम करू इच्छिते.