लंच मोठे, डिनर लहान

आपल्याला स्लीम व्हायचे असेल तर दुपारचे जेवण मोठे आणि रात्रीचे जेवण लहान असले पाहिजे असे अमेरिकेतल्या काही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या सिद्धांताचा संबंध माणसाच्या बॉडी क्लॉकशी आणि अन्नातली शर्करा शरीरात शोषून घेण्याच्या क्षमतेशी आहे. अन्नातून आपल्या साखर प्राप्त होते आणि तीच आपल्या क्रिया कलापात ऊर्जा म्हणून वापरली जात असतेे.

ही साधारण प्रक्रिया असली तरीही या प्रक्रियेचा वेग २४ तास सारखाच नसतो. तो कधी कमी होतो तर कधी अधिक असतो. हे काम स्वादुपिंडातून स्रवणार्‍या इन्शुलीन या द्रवाच्या साह्याने होत असते पण आपण झोपी जातो तेव्हा स्वादुपिंडाचे हे काम जवळपास बंद असते म्हणजे या काळात अन्नाचे पचन होत नसते. याबाबत अमेरिकेतल्या संशोधकांनी उंदरांवर प्रयोग केले आणि त्यांना संध्याकाळी जास्त तर दिवसा कमी खायला दिले. त्याचा परिणाम म्हणून उंदीर लठ्ठ झाले. माणसाच्या बाबतीतही असेच घडते असा त्यांचा अनुभव आहेे. हा प्रकार शास्त्रज्ञांनी थोड्या वेगळ्या शब्दांत सांगितला आहे.

आपल्या शरीराच्या बॉडी क्लॉकशी सुसंगत असे आहाराचे वेळापत्रक असावे असे ते म्हणतात. ही सुसंगती कमी झाली की शरीर बेडौल व्हायला लागते. ज्यांचे जगण्याचे वेळापत्रक बिघडलेले असते, ज्यांना कधीही जेवणाची सवय लागलेली असते, जे दिवसभरात कामाच्या नादात खाण्याच्या वेळा पाळत नाहीत आणि रात्री काम संपल्यानंतर शांतपणे पण भरपूर जेवण करतात त्यांच्या शरीरात चरबीचा साठा वाढलेला दिसतो. म्हणजे एकंदरीत आपल्या शरीरातल्या चरबीच्या प्रमाणावर आपण काय खातो याचा ङ्गारसा परिणाम होत नसून आपण जे काही खातो ते कधी खातो याचा परिणाम होत असतो असे दिसते.

जे लोक रात्री हेवी जेवण घेऊन लगेच झोपी जातात त्यांच्या शरीरात चरबी ङ्गार वाढते. पण जेवणानंतर दोन ते तीन तासाचा अवधी ठेवून जे झोपतात त्यांच्या बाबतीत मात्र हे चरबीचे प्रमाण कमी होते. काही लोकांत संध्याकाळी दिवे लागल्यानंतर काहीच न खाण्याचे व्रत असते. ते संध्याकाळी पाण्याचा थेंबही घेत नाहीत. अशा लोकांचे निरीक्षण केल्यावर असे आढळते की त्यांची शरीरे अगदीच स्लिम असतात. एकाच प्रकारचा आहार पण वेगवेगळ्या वेळी घेतला तर केवळ वेळ बदलल्याने त्या अन्नाचे परिणाम वेगळे होतात. काही लोक ङ्गार साधा आहार घेत असतात पण केवळ त्यांच्या जेवणाच्या वेळा बदलल्या तरीही त्यांच्या जाडीत वाढ झालेली दिसते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment