दाऊद इब्राहिमला लवकरच भारतात आणणार – सुशीलकुमार शिंदे

सोलापूर – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला लवकरच भारतात आणणार, असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते. भारत सरकार एफबीआयच्या संपर्कात आहे.

तसंच दाऊदच्या हालचालींवरही त्यांचं लक्ष आहे. त्यामुळे सगळं योग्य झालं तर दाऊदला लवकरच भारतात आणू, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री झाल्यानंतर 26/11 मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब आणि संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरु यांना फासावर लटकवण्यात आलं होतं. आता त्याच साखळीत 1993 मुंबई साखळी स्फोटाचा सूत्रधार दाऊदला भारतात आणण्याचा इरादा सुशीलकुमार शिंदे यांनी बोलून दाखवला आहे.

Leave a Comment