पुणे, – प्रसिद्ध सनई वादक पं. रमेश खळदकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 72 वर्सांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नातु असा परिवार आहे. खळदकर यांनी वयाच्या 5 व्या वर्षापासून सनईवादनाला सुरूवात केली होती.

पं.बाबुरावजी खळदकर यांच्या सोबत ताल वाद्याची साथ करता करता त्यांनी सनईवादनाचा रियाज सूरू ठेवला होता. 1958 पासून त्यांनी स्वतंत्र कार्यक‘म करण्यास सूरूवात केली. त्यांनी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासह कोलकता, हैद्राबाद, ग्वाल्हेर आणी ठिकाणांच्या संगीत महोत्सवात आपली कला सादर केली. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरही त्यांच्या अनेक कार्यक‘मांचे प्रसारण झाले होते.