नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होऊन 48 तासांच्या आतच राज्यातल्या पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाला आहे. राज्य सरकारने कर वाढवल्यामुळे राज्यात पेट्रोल 1 रुपया 86 पैशाने तर डिझेल 1 रुपया 21 पैशांने वाढले आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा कर वाढवल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा हा भडका घेतला आहे.
त्यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरवाढ झाली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने ही करवाढ अगदी बेमालूमपणे केली आहे. त्यामुळे पेट्रोल 75 पैसे आणि डिझेल केवळ 50 पैशांची वाढ झाल्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती मिळाली आहे. पण प्रत्येक्षात ही दरवाढ पेट्रोलसाठी 1 रुपया 86 पेसे प्रती लिटर तर डिझेलला 1 रुपया 21 पेसे प्रती लिटर एवढी झाली आहे.