राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा नेहमीच असते. राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये तसं जाणवतेही. राष्ट्रवादीच्या आजच्या आढावा बैठकीत शरद पवार यांनी भाषणाच्या शेवटी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी नव्या चेहºयाची टीम कशी करता येईल, हा पण एक दृष्टीकोन आहेच, असे म्हटले. त्यामुळे शरद पवार हे अजित पवार की सुप्रिया सुळे नेमकी कुणाच्या नेतृत्त्वात टीम बांधू पाहत आहेत, असा प्रश्न उपस्थित झाले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवारांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याची मागणी काही नेत्यांनी केली. पण शरद पवारांनी काँग्रेसबरोबर आघाडी करूनच राष्ट्रवादीला यश मिळेल, असे संकेत दिले. 2009च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने लोकसभेच्या 22 जागांवर उमेदवार उभे केले होते. तर काँग्रेसने 26 जागा लढवल्या होत्या. आता 2014च्या निवडणुकीतही 2009चा 26-22चा फॉम्युर्ला कायम राहील, असे राष्ट्रवादीनं स्पष्ट केले आहे.

22 जागांचे उमेदवार लवकरच जाहीर करू असा इशाराही राष्ट्रवादीने काँग्रेसला दिला आहे. दरम्यान, मंत्र्यांनाही निवडणुकीसाठी सज्ज व्हावे लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निक्षून सांगितले आहे. लोकसभा जागावाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गेले काही दिवस चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेस 22 जागांवर ठाम आहे आणि लवकरच उमेदवारांचीही घोषणा करण्यात येईल, असं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं तयारीला सुरुवात केली. त्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची 2 दिवसांची बैठक मुंबईत सुरू झाली.

महाराष्ट्रात नव्या चेहºयाची टीम कशी करता येईल, असा दृष्टीकोन आहे. आतापर्यंत आर्थिकदृष्ट्या सर्व कमकुवत घटकांना आरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका शरद पवारांनी वेळोवेळी व्यक्त केली होती. पण, नारायण राणे समितीच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पहिल्यांदाच गरीब मुस्लीम आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, अशी भूमिका जाहीरपणे मांडली. मराठा समाजाला राजकीय नव्हे तर शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्यायला हवे, असे शरद पवार म्हणाले. दिल्लीत सरकार स्थापन केल्यानंतर आम आदमी पार्टीचा बोलबाला सुरू झाला.

शरद पवारांना मात्र दिल्लीप्रमाणे देशात इतरत्र आपची जादू चालेल, असं वाटत नाही आहे. आप ला उद्देशून शरद पवार यांनी आजवर अनेक लाटा आल्या आणि गेल्या. दिल्लीचे गणित देशाला लागू होत नाही, असे म्हटले आहे. एवढंच नाही तर 4 राज्यांच्या पराभवानंतर महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. देशात जे होईल ते राज्यात होईलच असे नाही. त्यामुळे फार काही विपरित घडले असे काही नाही, असे म्हणत शरद पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळू शकते, असा आशावादही व्यक्त केला.

Leave a Comment