पणजीत इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू

पणजी: गोव्यातील पणजी परिसरात इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी आहेत. ढिगा-याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. घटनास्थाळी मदत कार्य जोमाने सुरू आहे.

पणजीपासून ७० किलोमीटर अंतरावर कैनाकोना या परिसरात शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली. येथील इमारतीचे बांधकाम सुरु असताना ही दुर्घटना घडली. ज्यावेळी ही इमारत कोसळली त्यावेळी ४० कामगार इमारतीत काम करत होते. त्यामुळे ढिगा-याखाली आणखी काहीजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी मदत कार्य जोमाने सुरू आहे.

इमारतीचे बांधकाम सुरु असताना ही दुर्घटना घडली. यामध्येघ नऊ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी रात्री उशीरा घटनास्थळी भेट देऊन, मदत कार्याची पाहणी केली.