बांगलादेशातच आशिया कप क्रिकेट स्पर्धा

कोलंबो : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात अराजकाता माजली आहे. आगामी काळात तेथील क्रिकेट स्पर्धेवर याचा काहीच परिणाम होणार नाही अशी खात्री बांगलादेशावर होणार नाही अशा बांगलादेश क्रिकेट मंडळाला वाटते; परिणामी आशिया कप क्रिकेट स्पर्धा ठरल्याप्रमाणे होईल असे आशियाई क्रिकेट समितीने जाहीर केले. त्याामुळे सर्वच क्रिकेट मंडळाने निश्वाास सोडला आहे.

या सर्व घटनाक्रमामुळे स्पर्धेच्या ठिकाणात कोणताच बदल करण्यात येणार नाही अन ती २४ फेब्रुवारी ते ७ मार्च या दरम्यान होईल असे आशियाई क्रिकेट समितीचे सीईओ अशरफउल हक यांनी सांगितले. ढाक्यातील बॉम्बस्फोटानंतर विंडीज युवा संघाने मायदेशी प्रयाण केले होते. त्याीमुळे आगामी काळात होत असलेल्या आशियाई क्रिकेट स्पार्धा होणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती.

बांगलादेशात होत असलेल्याह या आशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानलाही निमंत्रित करण्यात आले आहे. ११ सामने या स्पर्धेत खेळवले जातील. श्रीलंका संघदेखील बांगलादेशाचा दौरा २७ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान करणार असून २ कसोटी तर दोन टी २० क्रिकेट सामने खेळणार आहे.

Leave a Comment