फिटनेस वेड्या महिलांसाठी खास अॅप

आपण अगदी सडपातळ असावे, किमान तसे दिसावे ही प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. त्यात महिला आघाडीवर आहेत. डायट हा त्यांचा नेहमीच्या चर्चेचा विषय असतो आणि त्याला काळवेळाचे तसेच ठिकाणाचे कोणतेही बंधन नसते. अगदी एखाद्या समारंभात जरी एकमेकींची भेट झाली तरी पहिला प्रश्न अैय्या किती जाड झालीस, किंवा किती बारीक झालीस, काय डाएट करतेस, हा असणारच. अशा महिलांसाठी एक खास अॅप बाजारात आले असून कॅलरी काऊंटर असेच या अॅपचे नामकरण केले गेले आहे.

अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार्‍या या अॅपवर तीन कोटींपेक्षा अधिक पदार्थांची माहिती दिली गेली आहे. त्यात पदार्थात किती कॅलरीज आहेत आणि कोणत्या वेळी खाण्यास ते योग्य आहेत याचीही माहिती आहे. शिवाय हे अॅप मित्रमंडळाशी जोडणेही शक्य असल्याने आपल्रा मैत्रिणीचा फिटनेस प्रोग्राम जाणून घेता येणार आहे असे सांगितले जात आहे. हे अॅप आत्तापर्यंत १ कोटींपेक्षा जास्त युजरनी डाऊनलोड केले असल्याचा गुगल प्लेचा दावा आहे.