जगभरातील राजकीय नेत्यांच्या संपत्तीविषयी थोडेसे

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे पाकिस्तानातले सर्वाधिक श्रीमंत राजकारणी आहेत आणि त्यांची संपत्ती आहे १.४३ अब्ज डॉलर्स. दिल्लीचे मुख्यमंत्री बनलेले आप पक्षाचे केजरींवाल हेही कोट्याधीश आहेत आणि त्यांच्या पत्नीच्या संपत्तीसह २ कोटी १० लाखाच्या संपत्तीचे मालक आहेत. म्हणजे केजरीवाल कोट्याधीश राजकारणी लिस्टमध्ये सामील झाले आहेत. पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा केली जात आहे ते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी २ कोटी २५ लाख रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत तर नरेंद्र मोदी यांच्याकडे १ कोटी ३३ लाखांची संपत्ती आहे.

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची संपत्ती आहे २४७७०० कोटी रूपये. त्यानी ऑईल गॅस क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीमुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. त्या पाठोपाठ आहेत न्यूयॉर्कचे मेयर मायकेल ब्लूमबर्ग त्यांची संपत्ती आहे १९१९६७ कोटी रूपये. ते जगातील सर्वात श्रीमंत राजकारणी यादीत १३ व्या स्थानावर आहेत. ग्लोबल फायनान्शियल डेटा व मिडिया कंपनीचे ते संस्थापक आहेत. इटलीचे माजी पंतप्रधान साल्वियो बुर्लस्कोनी यांची संपत्ती आहे ३८३९३.५० कोटी. ते मिडियासेट कंपनीचे मालक आहेत तसेच इटालियन फूटबॉल क्लब एसी मिलानची मालकीही त्यांच्याकडेच आहे.

अमेरिकन हेन्री रॉस पेट हे त्याखालोखाल श्रीमंत राजकारणी आहेत व त्यांच्यापाठोपाठ लेबननचे नजीब मिकाती, थायलंडचे राजे भूमिबोल अदुलयादेज, ब्रुनेईचा सुलतान व उत्तर कोरियाचे नेते किम जाँग यांचा क्रमांक आहे.

भारतापुरते पाहायचे तर बिहारचे राज्यसभा सदस्य महेंद्र प्रसाद ६९२ कोटी रूपयांच्या संपत्तीने सर्वात आघाडीवर आहेत. त्यांच्यापाठोपाठ कर्नाटक राज्यसभचे सदस्य व उद्योगपती विजय मल्या ६१५ कोटी, जया बच्चन ४८४ कोटी, जगनमोहन रेड्डी ४४६ कोटी, आंध्राचे राज्यसभा सदस्य सुब्बा रेड्डी २५८ कोटी यांचा क्रमांक आहे.

Leave a Comment